उद्दिष्टे आणि कार्ये
निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र शासन, नवी दिल्ली. कार्ये
निवासी आयुक्त कार्यालयाची मुख्य कार्ये खालील प्रमाणे आहे:
केंद्र – राज्य समन्वय, संपर्क आणि गुतवणूक प्रोत्साहन
- राज्य आणि केंद्र शासनात समन्वय आणि संपर्क ठेवणे.
- नवी दिल्ली येथे विविध बैठका आणि परिषदांना उपस्थित राहुन राज्याचे शासनाचे प्रतिनिधीत्व करणे.
- महाराष्ट्रात गुंतवणूक सुविधा आणि राजकिय भेटीवर देखरेख ठेवणे.
- गुंतवणूक आणि आर्थिक विकास विषयांवर राष्ट्रीय परिषदेत सहभाग.
- वने आणि पर्यावरण संबधीत प्रस्तावाचा पाठपुरावा.
- खासदार महोदयांना राज्या सबंधित विविध विषयांबाबत सहाय्य करणे. राजशिष्टाचार, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय सहाकार्याला प्रोत्साहन देणे.
- महत्वाचे व्यक्तींचे आणि दिल्ली स्थिती इतर पात्र व्यक्तींची स्वागत आणि सुरक्षा पाहणे तसेच प्रशासकियराज्य अतिथी गृहाचे.
- व्यवस्थापन आणि पर्यटकांसाठी वाहतुक व्यवस्थापन पाहणे.
- राज्य अतिथी गृहाचे व्यवस्थापन आणि पर्यटकांसाठी वाहतुक व्यवस्थापन करणे.
राज्य निवासी आयुक्तांची अविशिष्ट कार्ये
- आंतर राज्य समन्वय : निवासी आयुक्त कार्यालय राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मध्ये विविध विषयांवर संवाद दुवा म्हणुन काम करते.
- आपत्ती व्यवस्थापन: राज्यात, केंद्रशासित प्रदेशात अथवा विदेशात नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात आपत कालीन मदतीचे कार्य म्हणुन समन्वयाची भुमिका राज्याच्यावतीने निवासी आयुक्त कार्य पार पाडते.
- आगामी कार्यक्रम: निवासी आयुक्त कार्यालय राज्याच्यावतीने परदेशी भारतीय, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, यांचाशी सर्वाधिक संपर्क साधते. भारतीय प्रवासी दिवसात सक्रिय सहभागाची भूमिका निभावते.
- इतर कामे: निवासी आयुक्त कार्यालये हे सांस्कृतिक केंद्र म्हणुनही कार्य करते.महाराष्ट्र माहिती केंद्राचे संरचनात्मक आणि प्राशासकिय कार्य तसेच दिल्लीस्थित विविध कार्यालयावर नियंत्रण हे कार्यालय महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (एमएसईबी), राज्य उद्योग आणि गुंतवणुक महामंडळ (एसआयसीओएम), महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळा (एमएसएसआयडीसी), महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र कृष्णा गोदावरी विकास महामंडळ (एमकेजीडीसी), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि सर्व संपर्क उपक्रम चांगला समन्वय साधने. याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा, वार्षिक मराठी पुस्तक मेळावा, भारतीय लोकसेवा आयोगातील सेवेत येणा-या ईच्छिकु उमेदवांराच्या अभिमत मुलाखती निवासी आयुक्त कार्यालया तर्फे राबविण्यात येतात.
निवासी आयुक्त हे महाराष्ट्र सदनाचे प्रशासिकय प्रमुख आहेत. त्यांच्या भूमिका या गुंतवणूक आणि राजशिष्टाचार आयुक्त म्हणुन सुद्धा आहेत.